महाराष्ट्र

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाबाबत आदर राखायलाच हवा…

मुंबई: निवडणूक आचारसंहितेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी अभद्र वर्तन करणाऱ्या*पोलिसांवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी तातडीने कारवाई करावी. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संबंधित पोलिसांवर कार्यवाही करून पुढील काळात अशा घटना घडणार नाही याची शाश्वती द्यावी

शीतल करदेकर -अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना निवेदन की, निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करणे हे कोणत्या कायद्यात बसते, हे कोणत्या आचारसंहितेत बसते ? हे कृपया सांगावे आणि घाटकोपर पश्चिम येते वार्तांकन करणाऱ्या लोकशाही वृत्तवाहिनीच्या स्वप्नील जाधव या पत्रकाराबरोबर ज्या प्रकारे पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे त्याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी आणि उचित कारवाई करावी हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात अर्थात या निवडणुकीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी आहे आणि म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. पोलीस यंत्रणेने पत्रकारांशी वागताना आदरपूर्वकच वागले पाहिजे समन्वय साधताना पत्रकारांना समाजविघातक प्रवृत्ती समजून वागणूक देणे हे अयोग्य आहे आणि म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी आणि पुढील काळात अशा प्रकारची घटना घडणार नाही याची शाश्वती द्यावी ही विनंती.

शीतल करदेकर,

संस्थापक अध्यक्ष

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया(माई)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

19 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago