मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभेत ‘उमेद’च्या मोर्चाचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून दररोज मोठा पाऊस पडत आहे आणि भर पावसातही सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानात मोर्चे येत आहेत. मोर्चे हे सरकारचे अपयश असते, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आजही आझाद मैदानात विविध संघटनांचे मोर्चे आलेले आहे, त्यांना सोयी सुविधा नाहीत. ‘उमेद’च्या मोर्चातही लाखो महिलांचा सहभाग आहे. कोविडच्या काळातील थांबवण्यात आलेले पैसे द्यावेत, मानधन वाढवूण देणे यासारख्या मागण्या आहेत. सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे पटोले म्हणाले.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…