महाराष्ट्र

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची

मुंबई: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा, पण जमिनीवर कोणताही आधार नसलेला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या सरकारने आता अर्थसंकल्पाच्या नावाने लोकांची दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे “नुसताच तोंडाचा पट्टा आणि काम शून्य” आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी थाप. कर्जमाफीचा फसवा ढोल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता गप्प का?”हातातोंडाशी आलेला घास हिसकावला” अशी शेतकऱ्यांची अवस्था. हमीभाव आणि खरेदीबाबत सरकार गप्प!सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हमीभाव वाढणार की नाही?सरकारी खरेदीची ग्वाही नव्हे, तर फक्त “भुलथापा”.

पीक विमा योजनांचा पोरखेळ शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळेल की नाही? की विमा कंपन्यांना फक्त फायदा?”नाव मोठे आणि लक्षण खोटे.

महिलांना दिलेली आश्वासने गटारात! “लाडकी बहिण” योजना फसवी! २१०० रुपये देण्याच्या घोषणेचा आता गजरा गायब!फक्त अटी वाढवल्या, पैसे मात्र हवेत विरले! महिलांच्या सुरक्षेचे काय?

अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, पण सरकारला गप्प बसायला वेळ आहे.

“सिंहासन मिळालं की जनतेला विसरायचं” हेच धोरण! असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.

तरुणाईसाठी नोकऱ्या नाहीत, फक्त फसवणूक!रोजगार निर्मितीचा बट्ट्याबोळ लाखो युवकांना नोकरभरतीचं गाजर दाखवलं, पण आता ती भरतीच नाही.”हात दाखवून अवलक्षण” करणाऱ्या सरकारला जनतेने जागा दाखवायची वेळ आली!शिक्षणावर खर्च नाही, जाहिरातींवर कोटी!विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती नाही, पण जाहिरातींवर अब्जावधींचा खर्च!

“डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला.

महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत, उलट गुजरातला जातायत!सरकार कधी महाराष्ट्राच्या विकासासाठी लढणार

गुंतवणूकदारांचे पाठ फिरवणारे सरकार म्हणजे राज्याचा घात.

आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये सरकारचा बेबंद कारभार ग्रामीण आरोग्य केंद्रं ओसाड, औषधं नाहीत.

सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधं नाहीत, पण मंत्र्यांसाठी खासगी इस्पितळं तयार.

गरिबांच्या नशिबी भोपळाच

पाणी, वीज, रस्ते यांची वाट लागली

“एकविसाव्या शतकात महाराष्ट्र असूनही लोकांना प्यायला पाणी नाही – हे कोणत्या मुख्यमंत्र्याचे यश आहे. विकासाच्या नावाखाली केवळ जाहिराती आणि खोटी स्वप्नं दाखवली जातायय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष यांनी असे म्हटले महायुती सरकार म्हणजे “शब्द मोठे, पण कृती शून्य. राज्य चालवायला पैसा नाही, पण आश्वासने मात्र ढिगानं देतात. कष्टकरी जनतेला हक्काचं दान नाही, पण नेत्यांच्या फायद्यासाठी भरमसाट निधी. “गरिबांना थापा आणि श्रीमंतांना लाभ” हे धोरण आता पुरे. जनतेच्या घशात खडा आणि बड्या उद्योजकांच्या तिजोरीत मोती” हे धोरण महाराष्ट्र सहन करणार नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा! आता वेळ आली आहे, सरकारला जबाबदारीला लावण्याची.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago