राजकीय

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी मात्र मोठा दावा केला आहे.

संजय पवार यांनी एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुणे आणि मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. वाढलेल्या गाठीभेटी आणि घडणाऱ्या राजकीय हालचाली पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुढील सहा महिन्यांत एकत्र येतील. आगामी निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवल्या जातील, असा दावा त्यांनी केला.

संजय पवार यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये संवाद वाढला असून, त्यातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचा त्यांचा दावा आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी संजय पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या छायाचित्राचा पक्षाच्या बॅनरवर वापर करण्यासाठी लेखी परवानगी घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांचा फोटो झळकला होता. या प्रकारावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे दोन्ही गटांतील संबंध सुधारत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे संजय पवार यांचा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

49 मिनिटे ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago