मुख्य बातम्या

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई रविवार, दि २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कारेगाव हद्दीतील रिया ऑफिसजवळ करण्यात आली.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल दिपक प्रकाश दळवी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साजिद बाबूलाल शेख (वय ३२, सध्या रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे; मुळ रा. आंबळे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास रांजणगाव एमआयडीसीतील कारेगाव गावच्या हद्दीत असलेल्या रिया ऑफिसच्या शेजारी संशयित साजिद शेख हा थांबलेला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या ताब्यात एक सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्तूल आढळून आले. या पिस्तुलाला मॅगझीन असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

संबंधित व्यक्तीकडे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करत साजिद शेख याला ताब्यात घेतले.

रांजणगाव औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने कामगार, कंपन्यांचे अधिकारी, व्यावसायिक आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा संवेदनशील परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणारी व्यक्ती सापडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित आरोपीने हे पिस्तूल कोठून आणले, त्याचा वापर कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार होता, त्याच्याकडे अन्य शस्त्रे किंवा जिवंत काडतुसे आहेत का…? तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का…? याचा तपास पोलिस येत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड आणि दिपक दळवी यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार तेजेस रासकर करीत आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे औद्योगिक परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अथवा गंभीर गुन्ह्यांच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

2 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

2 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

2 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

3 तास ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

3 तास ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

3 तास ago