महाराष्ट्र

निकृष्ट औषधांवर हायकोर्टाची कडक टिप्पणी; FDA च्या दिरंगाईवर ताशेरे

औषध तपासणीतील त्रुटींमुळे जनतेच्या आरोग्याला धोका; नागपूर खंडपीठाची चिंता

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाजारात विक्री होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत औषध विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. औषध विभागातील त्रुटींचा फायदा निकृष्ट औषधे तयार करणाऱ्या उत्पादकांना होत असून, त्याचा थेट परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, एम/एस ऑस्कर रेमेडीज प्रा. लि.चे संचालक अश्वनी लांबा व इतरांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर न्यायमूर्ती एम. एम. नेर्लीकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गडचिरोली येथील मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कथित निकृष्ट औषधनिर्मितीप्रकरणी सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

नियम ४५ बाबत हायकोर्टाचे स्पष्ट मत

न्यायालयाने औषध व सौंदर्यप्रसाधने नियम, १९४५ मधील नियम ४५चा सविस्तर अभ्यास करत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

औषधाचा नमुना मिळाल्यानंतर ६० दिवसांत अहवाल देणे शासकीय विश्लेषकावर बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ही मुदत पाळता येत नसेल, तर त्या कालावधीतच ठोस कारणांसह मुदतवाढ मागणे आवश्यक आहे.

निर्धारित कालमर्यादा ओलांडल्यानंतर किंवा मुदत संपल्यानंतर मागितलेली मुदतवाढ ग्राह्य धरता येत नाही, आणि अशा परिस्थितीत फौजदारी कारवाई पुढे चालू ठेवता येणार नाही, असा ठाम निर्णय न्यायालयाने दिला.

FDA च्या दिरंगाईवर बोट

उत्पादकाला नोटीस देण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा विलंब झाल्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. १९ एप्रिल २०२३ रोजी नोटीस देण्यात आल्याचे निदर्शनास आणत, ही प्रशासनाची गंभीर दिरंगाई असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

अन्न व औषध प्रशासनाला दिलेल्या ठोस सूचना

याचिकाकर्त्यांविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करताना, न्यायालयाने महाराष्ट्र FDA आयुक्तांना तीन महिन्यांत अंमलात आणावयाच्या सूचना दिल्या आहेत :

नियम ४५ मधील कालमर्यादांचे काटेकोर पालन

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

कामाचा ताण असल्यास अधिक प्रयोगशाळा उभारण्याची शासनाला शिफारस

६० दिवसांत अहवाल शक्य नसल्यास तात्काळ लेखी कारणांसह मुदतवाढ मागणे

औषध नमुने व अहवालांसाठी रिअल-टाईम ऑनलाइन प्रणाली विकसित करणे

संपूर्ण तपासणी प्रक्रिया वेबवर उपलब्ध करून देणे

औषध खरे की नकली? अशी करा ओळख

निकृष्ट औषधांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी खालील बाबी तपासाव्यात

पॅकेजिंग तपासा

प्रिंटिंग स्पष्ट, स्वच्छ आणि ठळक आहे का, हे पाहा. बनावट औषधांवर अक्षरे फिकट किंवा धूसर असतात.

कंपनीचा लोगो पाहा

मूळ औषधांवर लोगो स्पष्ट व अचूक असतो. नकली औषधांवर लोगो वेगळा किंवा तिरपा दिसू शकतो.

महत्त्वाची माहिती वाचा

मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, बॅच नंबर व MRP स्पष्ट छापलेले आहेत का, याची खात्री करा.

QR कोडने करा खात्री

बहुतांश मूळ औषधांच्या पॅकेजिंगवर QR कोड असतो.

मोबाईलमधील कॅमेरा किंवा QR स्कॅनरने कोड स्कॅन करा.

योग्य औषध असल्यास कंपनीचे नाव, उत्पादन तारीख, बॅच नंबर अशी माहिती दिसते

माहिती न आल्यास किंवा चुकीची माहिती दिसल्यास औषध बनावट असण्याची शक्यता असते

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

17 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

19 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

19 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

24 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

2 दिवस ago