महाराष्ट्र

नशिबाला हरवून मनगटावर विश्वास ठेवला! वयाच्या १३व्या वर्षी दूध- वर्तमानपत्र वाटणारा मुलगा आज 400 लक्झरीचा मालक

बेंगळुरूच्या रमेश बाबूंची संघर्षातून शिखरापर्यंत झेप

मुंबई: “नशिबात काय आहे यापेक्षा मनगटात काय आहे, यावर यश ठरतं” हे बेंगळुरूचे उद्योजक रमेश बाबू यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे. एकेकाळी घरोघरी दूध आणि वर्तमानपत्रे वाटणारा हा मुलगा आज तब्बल ४०० पेक्षा अधिक लक्झरी गाड्यांचा मालक आहे. रोल्स रॉयसपासून मर्सिडीज मेबॅकपर्यंतच्या गाड्यांचा ताफा आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची नेटवर्थ असा रमेश बाबू यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

वयाच्या १३ व्या वर्षी खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी

वडिलांच्या अकाली निधनानंतर रमेश बाबू यांच्या आयुष्यात संघर्षाची सुरुवात झाली. अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वर्तमानपत्र वाटणे, दूध विकणे आणि वडिलांचे छोटेसे सलून सांभाळणे अशी कामे केली. दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी सलून, असा त्यांचा दिवस असायचा. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षण सोडले नाही आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला.

एका मारुती ओम्नीने बदललं आयुष्य

१९९३ साली साठवलेल्या पैशातून आणि चुलत्यांच्या मदतीने रमेश बाबू यांनी पहिली मारुती ओम्नी व्हॅन खरेदी केली. ही गाडी त्यांनी भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि स्वतः ड्रायव्हर म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी व्यवसायाची संधी ओळखली आणि “रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स” या कंपनीची स्थापना केली.

लक्झरी कार बिझनेसचा गेमच बदलला

२००४ मध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेत पहिली मर्सिडीज-बेंझ ई-क्लास खरेदी केली. कॉर्पोरेट कंपन्या आणि सेलिब्रिटींना प्रीमियम गाड्यांची मोठी गरज आहे, हे ओळखून त्यांनी लक्झरी सेगमेंटमध्ये गुंतवणूक वाढवली. आज त्यांच्या ताफ्यात रोल्स-रॉयस घोस्ट, मर्सिडीज मेबॅक, जग्वार, ऑडी, बीएमडब्ल्यू, तसेच विंटेज कार आणि मिनीबस मिळून ४०० हून अधिक वाहने आहेत.

कोट्यवधींची संपत्ती, तरीही साधेपणा कायम

इतकी अफाट संपत्ती असूनही रमेश बाबू आजही जमिनीवर पाय ठेवून आहेत. ते आजही नियमितपणे त्यांच्या जुन्या सलूनमध्ये जातात आणि अनेक जुन्या ग्राहकांचे स्वतः केस कापतात.“माझा भूतकाळ मला नेहमी संघर्षाची आठवण करून देतो आणि साधेपणा शिकवतो,” असं ते अभिमानाने सांगतात.रमेश बाबूंची ही कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago