महाराष्ट्र

राज्यस्तरीय सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धेच उद्घाटन संपन्न

मुंबई: ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, बोरवली शाखा आणि ‘पोईसर जिमखाना’ आयोजित, राज्य स्तरीय सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा २०२५ चे (दि. 9)रोजी सकाळी 10 वाजता ‘पोईसर जिमखाना’, कांदिवली येथे मा. खासदार गोपाळ शेट्टी, पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, नाट्य परिषद, बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत, उपाध्यक्ष मोहन परब, विश्वनाथ माने, स्पर्धेचे परीक्षक सुप्रिया विनोद आणि अभिनेते अनिल गवस तसेच स्पर्धाप्रमुख प्रशांत जोशी आणि संदीप कबरे, हेमंत बिडवे, प्रफुल्ल कारेकर, राजन पिसाट, चंद्रकांत मोरे, समीर तेंडुलकर, सुरेश दळवी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. मा .खासदार गोपाळ शेट्टी ह्यांनी ह्या उपक्रमाचं कौतुक करून सर्व सहभागी संस्थांना शुभेच्छा दिल्या.

बोरिवलीतील ‘साईबाबा नगर’ येथे रसिक प्रेक्षकांसाठी नवीन नाट्यगृह, त्यांच्या प्रयत्नामुळे लवकरच सुरू होत आहे, असे जाहीर केले.ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘नाट्य परिषदे’चे प्रमुख कार्यवाह दामोदर (बाळा) टेंबुलकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी ‘बोरिवली शाखे’चे पदाधिकारी, समिती सदस्य, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते. एकांकिका स्पर्धेत एकूण २६ संस्थांनी भाग घेतला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 मिनिटे ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

8 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago