राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा केला निषेध
सांगली: स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी निषेध नोंदवला.
जयंतराव पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही.
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…