महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली असून, सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे घोषित स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे :

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,

राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,

ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,

खासदार सुनेत्रा पवार,

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,

माजी मंत्री धनंजय मुंडे,

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,

खासदार नितीन पाटील,

पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,

माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,

माजी मंत्री संजय बनसोडे,

माजी मंत्री नवाब मलिक,

अल्पसंख्याक महामंडळ अध्यक्ष मुश्ताक अंतुले,

आमदार शेखर निकम, अमोल मिटकरी,

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,

माजी खासदार समीर भुजबळ,

माजी आमदार अनिकेत तटकरे,

आमदार सना मलिक-शेख, सतीश चव्हाण, राजेश विटेकर, विक्रम काळे,

माजी आमदार झिशान सिद्दीकी,

आमदार इद्रीस नायकवडी,

अल्पसंख्याक नेते हाजी ईस्माईल शेख,

प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण,

सामाजिक सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे,

ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,

प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, प्रतिभा शिंदे,

अल्पसंख्याक नेते व ठाणे नगरसेवक नजीब मुल्ला,

विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

10 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

19 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago