आरोग्य

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो.

तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि हेल्थ एक्सपर्ट बिजय जे आनंद यांनी तूपाचा उपयोग शरीरात कोणत्या पद्धतीनं काम करतो ते सांगितले आहे. गरम पाण्यासोबत तूप मिसळून प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

पचनक्रिया चांगली राहते

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. तूप एक नैसर्गिक पाचक घटक आहे. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. गरम पाणी पचन तंत्रातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि टॉक्सिन्सशी लढण्यासही मदत होते

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

तूप नैसर्गिक स्वरूपात आतड्यांना पोषण देते. ज्यामुळे मल त्याग करण्याची प्रक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहतो. गरम पाणी पचन तंत्रातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.

त्वचा चमकदार दिसते

तुपातील हेल्दी फॅट्स आणि व्हिटामीन्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. तुप त्वचेच्या पेशींना आतून पोषण देते ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहरा कोरडा होणं, डाग येणं अशा समस्या उद्भवत नाहीत. चेहरा मऊ, मुलायम दिसतो.

वजन नियंत्रणात राहतं

बऱ्याच लोकांना असं वाटतं की तूप खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. पण हा चुकीचा समज आहे. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यानं शरीराचं मेटाबॉलिझ्म चांगलं राहतं. अन्न पचण्याची आणि कॅलरीज जळण्याची क्षमता सुधारते. तुपातील ओमेगा ३ आणि ओमेगा ९ दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटींग टाळता. जर तुम्हाला गरम पाण्यातून तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही वरण, भाजी किंवा पोळीत तूप घालून तुपाचा आहारात समावेश करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago