मुंबई: महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना ‘शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करुन घोषणा केली.
महत्वाच्या घोषणा
5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांत 2 सेवा केंद्रे
5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत 4 सेवा केंद्रे
महानगरपालिका क्षेत्रात अधिक केंद्रे उपलब्ध
सेवा शुल्क ₹20 वरून ₹50 होणार
घरपोच सेवा सुरू: ₹100 शुल्क
नवीन सेवा शुल्काचे वाटप
राज्य सेतू केंद्र: 5% (₹2.5)
महाआयटी: 20% (₹10)
जिल्हा सेतू सोसायटी: 10% (₹5)
VLE (सेवा केंद्र चालक): 65% (₹32.50)
घरपोच सेवा शुल्क: ₹100 प्रति नोंदणी
प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क: ₹50
आपले सेवा केंद्र घेण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता तुम्हीही सेवा केंद्र चालक (VLE) बनून अधिकृतपणे शासकीय सेवा देऊ शकता.
पात्रता आणि अटी
शिक्षण: किमान 10वी उत्तीर्ण
वय: 18 वर्षे किंवा त्याहून अधिक
संगणक ज्ञान आवश्यक
केंद्र सुरू करण्यासाठी जागा आवश्यक
इंटरनेट आणि प्रिंटर सुविधा असणे गरजेचे
नोंदणी प्रक्रिया
स्टेप 1: आपले सरकार सेवा केंद्राच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: नवीन VLE नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक माहिती भरा.
स्टेप 4: आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
स्टेप 5: अर्ज सबमिट करा आणि पडताळणीसाठी प्रतीक्षा करा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड / पॅन कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्रे
रहिवासी पुरावा
दुकान भाडे करारनामा / मालकी हक्क पत्र
पासपोर्ट साइज फोटो
परवानगी आणि प्रशिक्षण
अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जाईल
सेवा केंद्रासाठी अधिकृत परवाना मिळेल
केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर आणि लॉगिन माहिती मिळेल
सेवा केंद्र सुरू करून काय मिळणार
शासनमान्य प्रमाणपत्र
सरकारी सेवा पुरवण्यासाठी अधिकृत परवाना
शासकीय सेवा शुल्कातून उत्पन्न मिळण्याची संधी
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…