महाराष्ट्र

शरद पवारांना ताकद देणारी फळी कापली

संजय जगतापांच्या प्रवेशाने भाजपला ताकद तर शरद पवारांपुढे आव्हान संभाजी महामुनी

दिवे: भाजपने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बारामतीत पाठवून पवारांना वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारीदेत पवार घरण्यात प्रथमच राजकीय वॉर निर्माण केले होते; मात्र पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी अजित पवार यांचा विरोधात थेट भूमिका घेत सुप्रिया सुळे यांची विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आता खुद्द संजय जगताप हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शरद पवार यांना ताकद देणार्‍यांची फळी भाजपने कापून काढली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे वर्षानुवर्षे एक हाती वर्चस्व आहे. या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने आतापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सद्यस्थितीत पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद फार नगण्य असून पक्षासाठी खर्च करणारे करणारे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे त्याचबरोबर विविध गावाचे सरपंच यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात यापूर्वीच प्रवेश केला आहे.

तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात येणार्‍या जिल्हापरिषद, पंचायत समिती, सासवड, जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर पुढील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना धोबीपछाड करण्यासाठी भाजपला प्रथमच संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यात काँग्रेसपुढे पेच

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजपातील प्रवेशाने केवळ पुरंदर तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षावर थेट परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील मातब्बर मंडळी यापूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची मोठी वाताहत झाली आहे. अशातच जिल्हाध्यक्ष असलेले जगताप आता काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी होत असल्याने काँग्रेसपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

बुधवारी पालखी तळावर रंगणार प्रवेश

पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या भाजप प्रवेश बाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम मिळाला असून बुधवारी (दि. 16) सासवडच्या पालखी तळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. याबाबत संजय जगताप यांच्याशी संपर्क केला असता सोमवारी (दि. 14) पक्षातील कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्यातून चर्चा करण्यात येईल. तसेच त्यांची मते आणि भावना जाणून घेवून पक्ष प्रवेशाची भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंचा मार्ग केला खडतर

बारामती मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्वतः शरद पवार यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, दौंडचे राहुल कुल यांनी पवारांपासून यापूर्वीच फारकत घेतल आहे. भोरचे संग्राम थोपटे यांनी काही दिवसापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून पुरंदरमधून संजय जगताप आता भाजप मध्ये जाणार असल्याने भाजपला पवारांना रोखण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भक्कम साथ देणारी मातब्बर मंडळी भाजपमध्ये आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा मार्ग अधिक खडतर होणार आहे. यातून बारामतीत पवारांच्या मदतीनेच पराभूत करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी संधी प्राप्त झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

9 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago