महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार

जळगाव: जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरेगटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात 13 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या वाटेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने फोनवरून बोलताना प्रवेशाबाबत माहिती दिली असून, मुहूर्त उद्या निश्चित होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लड्डा यांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडणार असून प्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. त्यापूर्वी जर हा पक्ष प्रवेश झाला तर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे, तर दुसरीकडे जळगावात भाजपची ताकद वाढणार आहे, ज्याचा फयदा त्यांना महापालिका निवडणुकीसाठी होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीची बहुमतानं सत्ता आली. 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर अनेक लोक भाजपमध्ये जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago