माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
“अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली.
ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…