महाराष्ट्र

तृतीयपंथांच्या उपचारांचा प्रश्न आता मिटला…

महाराष्‍ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष आजपासून कार्यान्वित

मुंबई: तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथासाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपवार केंद्राचे ई उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथासाठी विशेष कक्ष बाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना महाजन म्हणाले की, तृतीयपंथाच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्य सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथावर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.

या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथावर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2 व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर ज.जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असलयाचेही महाजन यांनी सांगितले.

राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या 13 जिल्हयांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथी हा नवीन रकाना सुध्दा असणार असलयाचे या कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रस्ताविकात डॉ. सापळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, एकाची आत्महत्या; प्रेसनोट मध्ये पोलिसांनी आरोपीची नावे वगळली

शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था…

10 तास ago

2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल…

20 तास ago

क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता…

20 तास ago

रायगडावरील गडकोटांचे पावित्र्य जपा; संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करा; एकनाथ शिंदे

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन…

20 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार; भाजप सरकारवर सपकाळांचा घणाघात!

“संविधान धोक्यात, लोकशाही वाचवणे ही काळाची गरज”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी ठाणे: भारतीय…

20 तास ago

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी…

23 तास ago