महाराष्ट्र

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मंगलमय सुरुवात करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी आणि रमेश कोंडे यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

‘ही लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची’

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “समोर धनाढ्य आहेत, आपल्याकडे संघर्ष करणारे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी नेहमी धनशक्तीला भुईसपाट केले आहे. राज्यात प्रथमच शिवसेना १२० हून अधिक जागांवर लढत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता, निकालानंतर पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या समस्या सोडवल्या असून, पुणेकर शिवसेनेला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटच्या दिवसांत दबाव-दादागिरी होऊ शकते, मात्र शिवसैनिक घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे: लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महायुती होऊ शकली नाही, यासाठी मोठ्या भावाची अधिक जबाबदारी होती. शिवसेनेच्या मागण्या सन्मानजनक होत्या.” लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल. प्रचारात सकारात्मक राहावे, विरोधकांवर टीका टाळावी. शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांपाठीशी आहे.

शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात एकूण ११९ उमेदवार असून त्यामध्ये अनुसूचित जातीच्या दहा महिला आणि आठ पुरुष आहेत तर अनुसूचित जमातीचे एक, मुस्लिम समाजाचे पाच यामध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि ५५ पुरुष व ६५ महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. जे की इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा शिवसेना पक्ष ठरला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सत्तेत आल्यास पीएमपीमध्ये महिलांना अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात ‘आपला दवाखाना’, नवीन धरणे, अपघात-कोंडीमुक्त पुणे, मंदिरांचे संरक्षण करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.माजी मंत्री विजय शिवतारे यांनी संघटनात्मक ताकद आणि लढाऊ परंपरेवर विजयाचा विश्वास व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

4 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

7 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

8 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

8 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

8 तास ago