राजकीय

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव गटात राजकीय हालचालींना वेग आला असताना उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना पती मानसिंग पाचुंदकर यांची खंबीर साथ लाभत आहे. शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मानसिंग पाचुंदकर हे पत्नीच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत आहे.

शिरूर-आंबेगाव मतदार संघामधील गावांमध्ये मानसिंग पाचुंदकर यांनी आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची मोठी कामे केली आहेत. शिवाय, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. विकासकामे आणि जनसंपर्कामुळे ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याच्या भूमिकेतून पाचुंदकर कुटुंबीयांच्या वतीने मतदारसंघातील नागरिकांसाठी उज्जैन महाकाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून नागरिकांशी भावनिक नाते अधिक दृढ झाले असून, यात्रेदरम्यान नागरिकांनी ज्योती पाचुंदकर यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत.

mansing-pachundkar

ज्योती मानसिंग पाचुंदकर या प्रचारासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर आणि घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. यावेळी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या सर्व कामांमध्ये पती मानसिंग पाचुंदकर यांचे नियोजन, संपर्क आणि संघटन कौशल्य मोलाचे ठरत आहे.

आमदार दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन व पती मानसिंग पाचुंदकर यांची खंबीर साथ मिळत असल्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद गटात काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी भावना ज्योती पाचुंदकर यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

Video: जि.प. सदस्या स्वातीताई पाचुंदकर यांची मुलाखत…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago