महाराष्ट्र

खानापूर–विटा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर एकहाती सत्ता

सांगली: सांगली जिल्ह्यातील खानापूर–विटा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे भगवेमय झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे खानापूर तालुक्यात ‘बाबर गटाची’ पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली होती. महायुतीतीलच या नेत्यांमध्ये झालेली थेट लढत तालुकाभर चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, मतदारांनी सुहास बाबर यांच्या कामावर विश्वास टाकत भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

आटपाडी निंबवडे गटात भाजपच्या माधवी पडळकर (आ. गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी) विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या अ‍ॅड. विद्या मोटे यांच्यात चुरशीची लढत झाली.

भाजपला ‘व्हाईट वॉश’ दिल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून जल्लोष केला. “हा विजय सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. कितीही युती झाली तरी खानापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खानापूरमधील या एकतर्फी निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांचे वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकल्याने तालुक्याच्या विकासाला आता अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची दावेदारी अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

16 सेकंद ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

9 मिनिटे ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

3 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

4 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

4 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

4 तास ago