मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपले संघटनात्मक वर्चस्व कायम ठेवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके भावूक झाले. “अजित पवार आज हयात असते तर मावळमध्ये मोठा विजयोत्सव साजरा झाला असता. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत हा विजय साजरा करताना मनात वेदना आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मावळच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला, अनेक प्रकल्पांना गती दिली आणि त्याच विकासकामांची पावती मतदारांनी या निकालातून दिली, असे शेळके म्हणाले.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातूनही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. येथून विनायक मासाळ यांनी विजय मिळवला. उमेदवारी जाहीर करताना अजित पवार यांनी स्वतः मार्गदर्शन केले होते. मात्र आज हा विजय पाहण्यासाठी ते हयात नसल्याची खंत असल्याची भावना मासाळ यांनी व्यक्त केली.
मावळसह परिसरातील या निकालांमुळे अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांच्या गटाची स्थानिक पातळीवरील पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक व प्रादेशिक राजकारणावर या विजयाचा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…