महाराष्ट्र

व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा; ‘संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा’

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला.

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असल्याचा आरोप केला. केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणेच नव्हे, तर तो व्यावसायिक लाभासाठी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर तीव्र प्रतिक्रिया देताना भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “जर तुम्ही आमच्या संविधानाचे पालन करू शकत नसाल, तर भारत सोडून जा. कोणत्याही नागरिकाच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ दिली जाणार नाही,” असे खडेबोल त्यांनी सुनावले.

न्यायालयाने नागरिकांचा वैयक्तिक डेटा हा मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत, परदेशी कंपन्यांनाही भारतीय कायदे व संविधानाचे पालन बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या धोरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

7 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

9 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

9 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

14 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago