महाराष्ट्र

शिंदे – फडणवीस सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड कारण…

मुंबई: सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे. याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे यासर्वावर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरु आहेत. तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्यसरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात जयंत पाटील शिंदे – फडणवीस सरकारवर यांनी हल्लाबोल केला.

कॉंग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago