पुणे: मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय 75 ) यांचे गुरुवारी दुपारी हृदय विकाराने निधन झाले. भेगडे यांना छातीत दुखत असल्याने गुरूवारी सकाळी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास ते मरण पावले. वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात असल्याने ‘ पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी’ अशी घोषणा एकेकाळी गाजली होती.
मावळ विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी 1999 व 2004 अशा दोन वेळा विजय मिळवला होता. त्यापूर्वी त्यांनी मावळ पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले होते. त्यांनी भाजप पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…