महाराष्ट्र

…त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय त्यांच्यावर गंभीर दखल घेऊन कारवाई व्हावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्र्यांविषयीचे विधान बेजबाबदारपणाचे 

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक भुमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आ. दरेकर म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत पाहिलेय. आजही राज्याचा कारभार उत्तम चालवत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान नाही तर महाराष्ट्र देशाला आदर्श ठरणारे, दिशा दाखविणारे राज्य आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करत असतील तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. याची सभागृहाने गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर समज किंवा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य निदर्शनास आले तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, शासनाने गंभीर दखल घेतली आहे, असे उत्तर दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…

55 मिनिटे ago

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…

2 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…

2 दिवस ago

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…

3 दिवस ago

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…

4 दिवस ago

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…

4 दिवस ago