मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजी बोरीवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्र शासनाचे ‘कलादान’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ दशावतारी रंगकर्मी मा. श्री. यशवंत तेंडोलकर भूषवणार आहेत. त्यांच्या हस्ते ॲड. डॉ. अशोक भाईडकर लिखित ‘दशावतार’ या महाग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येईल.
कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. अॅड. श्री. आशिषजी शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्या शुभहस्ते ॲड. डॉ. अशोक भाईडकर यांच्या ‘The Great Indian Folk Drama: Dashavatar’ या इंग्रजी पुस्तकाचेही प्रकाशन केले जाणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख मा. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, वेताळ प्रतिष्ठानचे मा. डॉ. सचिन परुळेकर आणि प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते मा. श्री. प्रदीप विजया राधाकृष्ण कबरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या दोन दिवसीय संमेलनात रसिकांसाठी खास दशावतारी नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २० एप्रिल रोजी ‘मृत्युंजय महात्म्य’ आणि २१ एप्रिल रोजी ‘गोकुळचा चोर’ हे दोन प्रयोग सादर केले जातील. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) प्रायोजित हे दोन्ही प्रयोग सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या लोककलेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक ॲड. डॉ. अशोक भाईडकर आणि श्री. प्रदीप कबरे यांनी केले आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…