निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे, विजय आपलाच
मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कसबा पेठ मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. सध्याची राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अंत्यत गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळे ही फक्त निवडणूक नसून ही लोकशाही आणि संविधान रक्षणाची लढाई आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, हा उत्साह बघितल्यानंतर ही प्रचारसभा नसून विजयसभा असल्याचे वाटत आहे. आता निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे. विजय आपलाच आहे. प्रचारसभेसाठी येताना विजयसभेसाठी आल्याचे वाटत आहे. हा रोड शो होत असताना 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा येत होत्या. निवडणूक चिन्ह काँग्रेसचा म्हणजे सिंघमचा पंजा आहे. रवींद्र धंगेकर यांना विधानसभेत आणायचे आहे, आता तुम्ही तुमचे काम करा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, 32 वर्षांचा तरुण गद्दारांशी एकटा लढत आहे, असे तुम्ही म्हणता पण माझ्या पाठिशी जनता आहे. अंत्यत गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. आपल्या पक्षाचे नाव चोरले, पक्षाचे नाव चोरले, पण तुमच्या माथ्यावर गद्दार असा शिक्का आहे. 40 गद्दारांनी शिवसेना, महाविकास आघाडी आणि जनतेशी गद्दारी केली आहे. ते चोर आहेत, आणि चोर असाच त्यांचा उल्लेख होणार, ते गद्दार आहेत.
महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आणि जगाचेही लक्ष या निवडणुकीकडे आहे. देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे. विरोधकच नाही तर सामान्य माणासांनाही नोटीस पाठवत आहे. भाजपविरोधात बोलल्यावर विविध यंत्रणा नोटीस पाठवतात. त्यानंतर चोकशीचा ससेमिरा मागे लागतो. हे सर्व हूकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. हे वातावरण भयानक आहे.
आमच्या विरोधात बोलतात, तर आत टाकू ही दहशत निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे ही फक्त निवडणूक राहिली नसून देशाला दिशा देणारी घटना ठरली आहे. आता तुम्ही कोणाच्या बाजूने लढणार हे तुम्हाला ठरवायचे आहे. संविधानाच्या बाजूने लढणार की, लोकशाही संपवायला निघालेल्यांच्या मागे उभे राहणार हे तुम्हालाच ठरवायचे आहे. आपल्या देशात आजही सत्यमेव जयते ला महत्त्व आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…