महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारने MPSC विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये…

MPSC प्रकरणातील लढ्यात काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत, नोटीफिकेशन आल्याशिवाय माघार नाही…

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देऊनही अद्याप नोटीफिकेशन काढले जात नाही. शिंदे फडणीस सरकार व एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. तीन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात बेमुदत आंदोलन करत आहेत परंतु राज्य सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले, MPSC च्या अभ्यासक्रमात केलेल्या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागतच केले आहे पण त्याची अंमलबजावणी २०२३ पासून न करता २०२५ पासून करावी एवढीच मागणी आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना तयारी करण्यास वेळ मिळावा ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या, राज्य सरकारनेही एमपीएससीला तशा सुचना दिल्या परंतु एमपीएससी अद्याप नोटीफिकेशन काढत नाही त्यामुळे संभ्रम वाढला आहे. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे असे म्हणून कोणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतील. २०२५ पासून अंमलबजावणी करण्यास कोण आडकाठी करत आहे ? तो झारीतील शुक्राचार्य कोण आहे ? याचा शोध घेऊन विदार्थ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी याआधीही पुण्यात आंदोलन केले होते त्यावेळी त्यांना आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा तर सरकारच्या सुचनेचे पालन करण्यास आयोगातून कोण विरोध करत आहे का ? केवळ एमपीएससी स्वायत्त संस्था आहे म्हणून शिंदे-फडणवीस सरकार जबाबदारी टाळू करु शकत नाही. सरकारने सर्व मार्गांचा अवलंब करून तात्काळ नोटिफिकेशन काढण्यास एमपीएससी ला भाग पाडले पाहिजे. बेमुदत उपोषणावर असलेल्यापैकी गुरुवारी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालवाली आहे, विद्यार्थ्यांना काही झाले तर होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार व एमपीएससीच जबाबदार असेल, असेही लोंढे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…

22 मिनिटे ago

ऍलर्जीक खोकला लक्षणे व त्यावरील उपाय

ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…

52 मिनिटे ago

भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…

1 तास ago

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

15 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

15 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

15 तास ago