महाराष्ट्र

चंद्रभागेत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू

पंढरपूर: चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.

आषाढी यात्रेनंतरही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी (ता. १९) सकाळी येथील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये सुनीता सपकाळ (वय ४३) व संगीता सपकाळ (वय ४० रा. धावडा ता.भोकरदन जि.जालना) अशी मृत महिला भाविकांची नावे आहेत.

तर आणखी एका महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. त्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. धावड ता.भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्तपुंडलिक मंदिराजवळ नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ, सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी अशा तिघी पाण्यात बुडाल्या. या दरम्यान इतर महिलांनी आरडाओरडा केला. परंतु त्यांना वेळेत मदत मिळाली नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. काही वेळाने स्थानिक कोळी बांधवांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला असता, सुनीता आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचे मृतदेह सापडले. परंतु तिसऱ्या महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. या घटनेनंतर पोलिस तत्काळ घटनस्थळी दाखल झाले.

वेगवान प्रवाहामुळे घटना

उजनी धरण ९४ टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने पाण्याने चंद्रभागेतील मंदिरांना वेढा दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रेस्क्यू बोट नव्हती

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नदी पात्र दुथडी भरुन वाहत असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत बचाव पथक किंवा रेस्क्यु बोट ठेवण्यात आली नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. बचाव पथक असते तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असता, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

9 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

13 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago