महाराष्ट्र

तळोदा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून आदिवासी समाजाला मालक बनवणार

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका

तळोदा: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला.

तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य 21 उमेदवार तसेच नंदुरबार नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी आणि 41 उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे तळोदा येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत विकासाला अडथळा आणणाऱ्यांचा पराभव करून नगर परिषदांवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तळोदा, नंदुरबार, मुक्ताईनगर, वरणगाव आणि येवला येथील प्रचारसभांनी निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे. या सभांना नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना मोठी गती मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गर्दीचा एवढा मोठा ओघ पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी “धनुष्यबाण”ाच्या समर्थनार्थ घोषणा, ढोल-ताशे आणि भगवे झेंडे जल्लोषाचे वातावरण दिसत होते.

तळोद्यासाठी दिलेल्या विकासनिधीचा तपशील मांडताना त्यांनी आजवर दिलेल्या 125 कोटींपैकी राजपथ रस्त्यासाठी 22 कोटी, पाणीपुरवठा योजनांसाठी 16 कोटी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी 2 कोटी वाटप झाल्याचे सांगितले. शहरासाठी भविष्यातील विकास आराखडा जाहीर करत त्यांनी नवीन फिल्टर प्लांट, स्वच्छ पाणीपुरवठा, डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.

सभेतील महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीकडे पाहून शिंदे म्हणाले, “तळोद्यात बदलाची सुरुवात झाली आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि संरक्षण ही सरकारची प्राथमिकता आहे. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहेच, पण ती आणखी प्रभावीपणे राबवली जाणार आहे.” याचबरोबर मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण, एसटी प्रवासात ५० टक्के सूट, माता सुरक्षित परिवार आणि स्वरोजगारासाठी आर्थिक मदत यांसारख्या योजनांची आठवण त्यांनी करून दिली.

दरम्यान मुक्ताईनगर मधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना पाटील, वरणगावच्या तृप्ता महाजन आणि येवला मधील स्वाती पाटील यांच्यासाठीच्या प्रचार सभांमध्ये शिंदे यांनी ‘विकासाचा अजेंडा’ अधिक ठळकपणे मांडला. “जात, धर्म अथवा राजकीय सूड ठेवून नाही तर विकासासाठी मतदान करा. खुर्ची आमचा उद्देश नाही, विकास हा शिवसेनेचा एकमेव राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

मुक्ताईनगर आणि परिसरासाठी मुख्यमंत्री असताना केलेल्या निधी वितरणाचा उल्लेख करत त्यांनी सिंचनासाठी ३५०० कोटी, रस्त्यांसाठी ५०० कोटी, एमआयडीसीसाठी ५०० कोटी आणि पुलांसाठी १५० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. मुस्लिम समाजासाठी करण्यात आलेल्या १२ कोटींच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी धार्मिक सलोखा आणि विकासाच्या समतोल धोरणाची भूमिका स्पष्ट केली. सभेच्या शेवटी शिंदे यांनी भावनिक आणि थेट भाषण करत उपस्थितांना आवाहन केले. “दोन डिसेंबरला धनुष्यबाणाचं बटण दाबा. बाकी विकास माझ्यावर सोडा. मी दिलेला शब्द आणि तुमचा विश्वास हे दोन्ही मी पाळणार.”

दरम्यान, सभांमधील प्रचंड उपस्थिती, महिलांचा उत्साह, आणि विकासावर आधारित निवेदन पाहता आगामी निवडणुकीत शिवसेनेची भगवी लाट अधिक वेगाने पसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago