महाराष्ट्र

राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वामनदादा कर्डक यांचे नाव; सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

मुंबई: लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला आता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘ शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार – लोककला क्षेत्र’ असे नावाने ओळखले जाईल.

लोककलेला योग्य प्रतिष्ठा

राज्यातील लोककला परंपरेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारदरवर्षी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करते. या पुरस्काराला मान्यवर व्यक्तिमत्वाचे नाव देण्याचा प्रस्ताव काही काळ विचाराधीन होता. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या वामनदादा कर्डक यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. लवकरच या नव्या नावाने सुधारित पुरस्कार जाहीर केला जाणार आहे.

लोककवी वामनदादा कर्डक यांचे कार्य

महाराष्ट्रातील लोककलेचा ठसा उमटवणारे, सामाजिक बदलाचे प्रवर्तक आणि दलित साहित्य चळवळीचे सांस्कृतिक व्यासंगी म्हणून वामनदादा कर्डक (१९१४–२००४) यांचे नाव विशेष मानाने घेतले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची लोकाभिमुख मांडणी त्यांनी जनमानसात पोहोचवली. सशक्त शब्दांकन, धारदार आशय आणि लोकभाषेतील ओघवती शैली ही वामनदादांच्या काव्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या गीतांनी आणि पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहावर कायमस्वरूपी छाप पडली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago