महाराष्ट्र

मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज बंद

चाकण: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणा-या मोर्च्यामुळे गुरुवारी (दि.२८) तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे मोर्चासह गुरुवारी (दि. २८) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन करुन नारायणगाव मार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव दाभाडे- लोणावळामार्गे आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहेत. त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव वाहनांसह येणार असल्याने मराठा समाज बांधवांची गर्दी होवून मोर्चा मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सदर मोर्चा कालावधीत मोर्चा मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या कालावधीसाठी अन्य पर्यायी मार्गांनी वळविण्यात आलेली आहे. चाकण, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, देहूरोड, दिघी आळंदी, भोसरी, निगडी, तळवडे वाहतुक विभागांतर्गत एक दिवसाकरीता तात्पुरत्या स्वरुपात हा वाहतूक बदल करण्यात आला आहे. तळेगाव ते चाकण राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी मार्गावर येणारी व जाणारी सर्व वाहतूक गुरुवारी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच तळेगाव-चाकण महामार्गावर येण्यास वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूरकडून चाकण चौकमार्गे पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने माणिक चौक येथून डावीकडे वळून भारतमाता चौक नाशिक फाटा मार्गे इच्छितस्थळी जातील.

मुंबई बाजूने चाकणकडे जाणारी सर्व वाहने सेंट्रल चौक-भक्ती शक्‍ती चौक (निगडी) – त्रिवेणीनगर चौक-तळवडे गावठाण चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. मुंबईकडून द्रुतगती मार्गे येऊन नाशिककडे जाणारी सर्व वाहने उर्से टोल नाका अथवा सोमाटणे एक्झिट येथून बाहेर पडून पुढे सोमाटणे टोल नाका- सेंट्रल चौक – भक्ती-शक्‍ती – नाशिक फाटा येथून डावीकडे वळून पुढे भारतमाता चौक – हवालदार वस्ती -देहू फाटा – डावीकडे वळून चाकण चौक आळंदी -जोग महाराज धर्मशाळा -उजवीकडे वळून (४० फुटी रोड) वडगाव रोड डावीकडे वळून वडगाव घेणंद सरळ कोयाळी कमान – रसिका हॉटेल – उजवीकडे वळून शेल पिंपळगाव -अमृत स्विट्स येथून डावीकडे वळून दावडी मार्गे निमगाव – खेड बायपासमार्गे इच्छितस्थळी जातील.

जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र.४८ वरून सोमाटणे ते तळेगाव मार्गे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेत येत आहे.पर्यायी मार्ग म्हणून वाहने सेंट्रल चौक येथून डावीकडे वळून मुकाई चौकमार्गे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने इच्छितस्थळी जातील. अथवा भक्ती-शक्‍ती सर्कल येथून डावीकडे वळून अप्पूघर कॉर्नर मुकाई चौकमार्गे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने इच्छितस्थळी जातील.किंवा सोमाटणे फाटा,परंदवाडी रोड मागें पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने इच्छितस्थळी जातील.

पुणे-नाशिक महामार्गावरील भारतामाता चौक ते नाशिककडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेत येत आहे.पर्यायी मार्ग म्हणून भारतमाता चौक -हवालदार वस्ती – देहू फाटा -डावीकडे वळून चाकण चौक आळंदी – जोग महाराज धर्मशाळा – उजवीकडे वळून (४० फुटी रोड) वडगाव रोड – डावीकडे वळून वडगाव घेणंद -पुढे सरळ कोयाळी कमान – रसिका हॉटेल -उजवीकडे वळून शेल पिंपळगाव – अमृत स्व्ट्स येथून डावीकडे वळून दावडीमार्गे निमगाव – खेड बायपासमार्गे इच्छितस्थळी जातील.

गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री १ वाजेपासून मोर्चा पुणे ग्रामीण हद्दीत जाईपर्यंत आवश्यकतेनुसार अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी काढला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

15 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago