औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही.
नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार
ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील.
नियम तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
हा आदेश तात्काळ प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.
परिवहन मंत्र्यांची नाराजी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी तक्रार केली की
काही पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलने मोठ्या प्रमाणावर वाहनांचे फोटो काढतात.
नंतर हे फोटो सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान तयार करतात.
या पद्धतीबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चुकीच्या पद्धतीने ई-चलान देणाऱ्यांना इशारा
काही पोलीस अधिकारी अजूनही स्वतःचे मोबाईल वापरून
चुकीच्या वेळेचे फोटो अपलोड करतात
नंतर ते ई-चलान प्रणालीत टाकतात
आणि चुकीच्या वाहनधारकांवर दंड लावतात
आता असे करताना कोणी सापडल्यास
संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांनी दिला आहे.
आता वाहतूक पोलिसांनी खाजगी मोबाईल वापरून ई-चलान करणे बंद केल्यामुळे, चुकीच्या दंडप्रकरणांना आळा बसणार आहे.
वाहनधारकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…