महाराष्ट्र

फेब्रुवारीत दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

मुंबई: राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव राबविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा ५ व ६ फेब्रुवारीला ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर, कार्याध्यक्ष शीतल करदेकर,

शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंत, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल, व‌ अध्यक्ष दिलीप कोरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, मुंबई साहित्य संघाच्या प्रतिनिधी प्रतिभा बिश्वास, मनपा शिक्षक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधी साधना कुदळे, पी. पी गायकवाड,सुनिल आग्रे, भगवान परब आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद,व्याख्यान, लेखक आपल्या भेटीला असे दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. यावेळी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

“आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचन संस्कृती रूजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेवून लोकसहभाग वाढवावा.*तरुण पिढीसाठी ज्ञानाचा संगम आणि वाचनाची उर्जा मिळावी* यासाठी ग्रंथोत्सव हा ‘लोकोत्सव व्हावा’, अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

9 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago