आरोग्य

तोंडातील फोड आणि हिरड्यांची समस्या तुरटीचा उपयोग केल्याने होतील दूर

तोंडाला येणारे फोड ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येचा त्रास खूप जास्त होतो. तोंडात फोड आले तर काही खाणं-पिणं अवघड होऊन बसतं. अशात वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण औषधांऐवजी ही समस्या एका नॅचरल उपायाने दूर करता येते. तो उपाय म्हणजे तुरटी.

तोंडातील फोड: तोंडाला आलेले फोड अनेक दिवस त्रास देतात. जोपर्यंत हे फोड असतात तोपर्यंत तुम्ही योग्यपणे खाऊही शकत नाही आणि काही पिऊही शकत नाही. जर तोंडात फोड झाले असतील तर तुरटीच्या पाण्याने दोन ते तीन वेळ गुरळा करा. दोन दिवसात आराम मिळेल.

हिरड्यांची समस्या: अनेकदा लोकांमध्ये हिरड्यांची कमजोरी, हिरड्यांमधून पस येणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या बघायला मिळतात. या समस्या तुम्ही केवळ 2 रूपयांच्या तुरटीने दूर करू शकता. यासाठी तुरटीचं पावडर तव्यावर टाकून जाळा. या पावडरने बोटांच्या मदतीने हिरड्यांवर घासा. दोन दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

त्वचेची समस्या: खाज, फोड, पुरळ अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. तुरटी आंघोळ करताना शरीरावर घासू शकता. याने तुमच्या त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतील. सोबतच घामाची दुर्गंधी येणंही बंद होईल. तसेच सुरकुत्याही दूर होतील.

तळपायांवर डाग: तळपायांवर मृत पेशी, डाग असतील तर तेही तुरटीच्या पाण्याने दूर करण्यास मदत मिळते. तुरटीच्या पाण्याचं मिश्रण तयार करा आणि पायांवर लावा. याने पायांवरील मृत पेशी, जखमा बऱ्या होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago