महाराष्ट्र

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांनी देशसेवा बजावताना सर्वोच्च बलिदान दिले.

या दुःखद घटनेबद्दल उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करत दोन्ही शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘एक्स’वरील आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.

सीमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या स्फोटात दोन्ही जवानांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे ऐरोली आणि शहापूर परिसरात शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणारे विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेतून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago