मुख्य बातम्या

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे.

एका दिवसातच पोलीस पथकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून ३७ हजार रुपये दंड वसूल केले आहेत. या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत पीएस आय नखाते, पोलीस हवालदार वाघमोडे, महिला पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस पथक अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत असून, वाहतूक शिस्त, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी आणखी कठोर मोहिमा राबवल्या जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago