महाराष्ट्र

‘यूजी 4.0’मुळे अध्यापक बदलत्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत होतील; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत ‘यूजी 4.0’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यापकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) तर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘यूजी 4.0’ या सर्वसमावेशक ऑनलाइन अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यात मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, University of Mumbai चे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, नव्या शैक्षणिक आराखड्यात मल्टीपल एन्ट्री-एक्झिट तसेच क्रेडिट-आधारित प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यापकांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरणार असून त्यांना सक्षम करण्यासाठी एमएसएफडीएने हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.

‘यूजी 4.0’ कार्यक्रम एमएसएफडीएच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस)द्वारे पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अध्यापकांना हा कार्यक्रम सहज उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात एकूण नऊ सविस्तर मॉड्यूल्सचा समावेश असून प्रत्येक मॉड्यूलद्वारे शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीवर भर देण्यात येणार आहे.

प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी ३० ते ६० मिनिटांचा ठेवण्यात आला असून शिक्षकांना स्व-अभ्यासाच्या लवचिकतेसह प्रशिक्षण पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. संस्थात्मक तयारी, विद्यार्थी समुपदेशन आणि शैक्षणिक प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवरही या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाशी संलग्न सर्व महाविद्यालये व विद्यापीठांतील अध्यापक या कार्यक्रमासाठी पात्र असून इच्छुकांनी एमएसएफडीएच्या एलएमएस पोर्टलवर जून महिन्यापासून नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.दरम्यान, ‘यूजी 4.0’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पुढील टप्प्यात अधिक प्रगत अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची योजना असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

15 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

18 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

20 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago