महाराष्ट्र

दबाव सहन होत नसल्याने बँक अधिकाऱ्याची बँकेतच आत्महत्या

बारामती: वरिष्ठांचा अतिरिक्त दबाव सहन झाल्याने सुसाईड नोट लिहून येथील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शिवशंकर मित्रा असे आत्महत्या केलेल्या मुख्य व्यवस्थापकांची नाव आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे.

शिवशंकर मित्र (वय 52) रा. प्रयागराज असे या बँक प्रबंधकाचे नाव असून त्यांनी पाच दिवसापूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काल रात्री त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्ये पूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली.यामध्ये त्यांनी नमूद केले की, मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात.

मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वतःच्या इच्छेने करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे. पत्नी प्रिया यांना उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर. माही मला माफ कर ! असे त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं आहे. त्यांनी शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत अशी देखील इच्छा व्यक्त केली.बँकिंग क्षेत्रातील विशेषता खाजगी बँकांच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील वार्ता दबावाचे दबावाचा शिवशंकर मित्र हे बळी ठरले आहेत. मित्रा यांच्या पत्नी माही यांना या घटनेने मोठा धक्का बसला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

18 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

18 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

22 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

22 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

22 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

23 तास ago