महाराष्ट्र

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ आणि २०२७-२८ पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा

विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि विविध समस्या थेट जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आठवड्यातून एक दिवस ५० विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. तसेच प्र-कुलगुरूंनीही ५० विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. या संवादातून समोर आलेल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महाविद्यालयांचे क्लस्टर, संसाधनांचे सामायिकरण

NEPच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील महाविद्यालयांचे क्लस्टर निश्चित करून त्यांच्यात उपलब्ध मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि अन्य शैक्षणिक संसाधनांचे सामायिकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर राज्यांमध्ये NEPची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जात आहे, याचा अभ्यास करण्यासाठी परीक्षा नियंत्रक विभागाच्या प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले. मुंबई विद्यापीठासह विविध विद्यापीठांनी तयार केलेल्या क्लस्टर अभ्यासक्रमांचा सखोल अभ्यास करून राज्यासाठी सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण क्लस्टर अभ्यासक्रम तयार करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक विद्यापीठाने दर महिन्याला किमान एक क्लस्टर उपक्रम राबवावा, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

२०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी आवश्यक वेळापत्रक एका आठवड्यात निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) निश्चित केलेल्या कार्यभारानुसार विद्यापीठांमध्ये एकसमानता आणावी. तसेच आवश्यक अभ्यासक्रमांमध्येही समानता निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

पेपरफुटी रोखण्यासाठी SOP

परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर विभागाने मार्गदर्शक नियमावली (SOP) तयार करून प्रसिद्ध करावी, असे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. पेपरफुटी रोखण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक काढून आवश्यक सूचना निर्गमित करण्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago