मुंबई: अंबोजवाडी, मालाड पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या ५ एकरच्या भूखंडावर स्मशानभूमी व दफनभूमीचे काम तातडीने सुरु करण्यात यावे,अशी मागणी मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.
शेख म्हणाले, मुस्लीम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमीसाठी अंबोजवाडी, मालवणी, मालाड पश्चिम येथील ०५ एकरचा भूखंड २०३४ च्या शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित आहे. २०१८ साली शासनाने पालिकेला याचा आगाऊ ताबा दिला होता. मात्र २०२५ साल उजाडले तरी अजून स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचे काम सुरु झाले नाही. त्यात आता अशी देखील चर्चा कानावर येत आहेत की, दफनभूमी व स्मशानभूमी येथून स्थलांतरित करण्यात येणार आहे.
या दफनभूमी व स्मशानभूमींसाठी १० वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. जर दफनभूमी व स्मशानभूमीची जागा बदलण्यात आली, तर पुढे आणखीन १० वर्ष संघर्ष करावा लागेल.
ह्या दफनफूमी व स्मशानभूमीची जागा बदलण्यात येऊ नये, व लवकरात लवकर अंबोजवाडीच्या आरक्षित भूखंडावर दफनभूमी व स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी शेख यांनी केली. यावर उत्तर देताना यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…