आरोग्य

थंडी मध्ये लिंबू पाणी प्यावे कि नाही

दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी सकाळ अत्यंत सुंदर आणि हेल्दी असली पाहिजे, ज्यासाठी अनेक लोक चहा किंवा कॉफीची मदत घेतात, पण यामुळे आपण हेल्दी नाही, तर अजून जास्त आजारी पडू शकता. होय, चहा आणि कॉफी मध्ये कैफीनचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी अपायकारक असते. त्यामुळे आता तुम्ही विचार करत असाल कि थंडी मध्ये सकाळची सुरुवात कशी केली पाहिजे ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस एनर्जी ने भरपूर राहाल आणि सोबतच आपण हेल्दी देखील राहाल.

चला तर जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी केली पाहिजे. आज आपण लिंबूपाणी बद्दल जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यात तर आपण यास भरपूर सेवन करतो. पण थंडीच्या दिवसात यास प्यावे का नाही प्यावे या बद्दल कन्फ्युज असतो. खरंतर सगळ्यांना असे वाटते कि थंडीच्या दिवसात लिंबूपाणीमुळे आपण आजारी पडू शकतो. पण असे मुळीच नाही आहे. होय, थंडीमध्ये लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर हे आपल्यासाठी वरदान होऊ शकते. चला तर जाणून घेऊ थंडीत म्हणजेच हिवाळ्यात लिंबूपाणी कसे सेवन केले पाहिजे.

थंडीत असे प्यावे लिंबूपाणी

थंडी मध्ये गरम पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायले पाहिजे आणि यास दररोज सकाळी सेवन केले पाहिजे. जर आपण नियमितपणे यास सेवन केले तर आपल्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे जाणवेल. याच सोबत आपल्याला वाटले तर लिंबूपाणी मध्ये थोडेसे मध मिक्स करून सेवन करू शकता. तर चला जाणून घेऊ हिवाळ्यात गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिण्यामुळे काय काय फायदे मिळू शकतात.

रोग प्रतिरोधक क्षमता होते मजबूत

रोज गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पाणी पिण्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. लिंबू मध्ये व्हिटामिन सी, आयरन असते ज्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. याच व्यतिरिक्त यास पिण्यामुळे हिवाळ्यात आपण सर्दी-खोकला यापासून वाचू शकतात. त्यामुळे याचे नियमित वापर करावे.

वजन कमी करण्यात मदतशीर

रिकाम्या पोटी सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू पिण्यामुळे वजन कमी होऊ शकते. होय, यामुळे पचनशक्ती वाढू शकते आणि फ़ैट वेगाने बर्न होते ज्यामुळे वजन कमी होऊ लागते. त्यामुळे दररोज रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबू पिळून पिण्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

लिव्हर राहते हेल्दी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिण्यामुळे लिव्हर हेल्दी राहते. खरंतर लिव्हरचे आरोग्य मेटाबॉलिज्मचा सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहे आणि गरम लिंबूपाणी पिण्यामुळे लिव्हर साफ होते, ज्यामुळे ते दिवसभर सक्रिय राहते. त्यामुळे दररोज लिंबूपाणी प्यायले पाहिजे आणि यामुळे आपण लिव्हर संबंधीतील समस्ये पासून वाचू शकता.

पचनशक्ती ठेवते व्यवस्थित

रोज रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिण्यामुळे पचनशक्ती व्यवस्थित राहते. लिंबूपाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी तत्व युरीन मार्गे बाहेर फेकली जाते आणि यामुळे पोट स्वच्छ राहते. त्यामुळे रोज गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे आवश्यक आहे.

ग्लोइंग स्किन

जर आपल्याला ग्लोइंग स्किन मिळवायची असेल तर दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे. असे केल्याने आपल्या बॉडी मधील विषारी तत्व बाहेर फेकले जातात आणि यामुळे आपली स्किन साफ होते. एवढेच नाही आपल्याला मुरुमांची समस्याच आहे तर ही समस्या लिंबू पाणी पिण्यामुळे दूर होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

4 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

4 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

20 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

20 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

20 तास ago