आरोग्य

प्रमाणापेक्षा जास्त घाम येण्याची कारणे व उपाय

गरमीच्या दिवसात जास्त घाम येणे सामान्य बाब आहे. पण तसं नसेल तरी खूप जास्त घाम येणे ही गंभीर बाब असू शकते. अनेकदा याकडे अनेक जण फार गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया जास्त घाम येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय.

घाम की हायपरिड्रोसिस

शरीरातून घाम येणे किंवा खूप जास्त घाम येणे या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे हायपरिड्रोसिस म्हटले जाते. घाम येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. जर एखाद्या व्यक्तीचं शरीर वेगळ्या प्रकारे काम करत असेल तर जास्त घाम येतो. तसं पहायला गेलं तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण यामुळे व्यक्तीला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो.

कारणे

जास्त घाम येण्यामागे अनेकदा नर्वस सिस्टमचाही हात असतो. अनेकांच्या हातांना आणि पायांना जास्त घाम येतो. असे शरीराच्या कार्यप्रणालीत थोडा बिघाड झाल्याने होतं. पण याने घाबरण्याची गरज नाही. या समस्येचं निदान करण्यासाठी शल्य चिकित्सा करुन घामाच्या ग्रंथी काढल्या जातात, याने त्या व्यक्तीला भविष्यात जास्त घामाची समस्या होत नाही. तर काही व्यक्ती मध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, थॉयराईड, टयूबरकुलोसिस, स्टोक, पार्किसंस रोग, ल्यूकेमिया आणि लिम्फोमा यामुळेही जास्त घाम येतो.

तसा तर घाम येण्यावर काही घरगुती उपायही शक्य आहेत. पण काही लक्षणे अशी असतात ते पाहून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

रात्री झोपताना अधिक घाम येणे.

शरीराच्या केवळ एकाच भागात जास्त घाम येणे.

शरीराच्या प्रत्येक अंगाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे.

काही औषधे घेतल्यावर जास्त घाम येणे.

कधी खूप जास्त घाम येऊन हैराण होणे.

उपाय

तशी तर जास्त घाम येण्याची समस्या सर्जरी करुनच दूर केली जाते. पण हायपरिड्रोसिसची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही वेगळे उपचारही केले जाऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची…

4 तास ago

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…

1 दिवस ago

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

2 दिवस ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

2 दिवस ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

2 दिवस ago

मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…

2 दिवस ago