महाराष्ट्र

वर्षा देशपांडे यांच संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी वादावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यातच एका मराठमोळ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले.

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या सोहळ्यात चक्क मराठी भाषेतून त्यांनी जगाशी संवाद साधला. सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित मान्यवरांचे नाव घेत त्या पुढे म्हणाल्या की, मी इंग्रजीतून बोलू शकते, परंतु महिला म्हणून मी या क्षेत्रात वावरताना माझी मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा आदर या व्यासपाठीवर व्हावा त्यामुळे मी माझ्या मातृभाषेत बोलत आहे. हा सन्मान संपूर्ण जगभरातील, भारतातील, महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांच्या सोबत राहून लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हा सन्मान होतोय अशी माझी धारणा आहे. संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मुल्याचे आणि तत्वाचे, मानवी प्रतिष्ठा, उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्कांसाठी मी त्यांच्यासोबत राहण्याची ग्वाही देते असं त्यांनी म्हटलं.

इतकेच नाही तर आपण सर्व जण मिळून आजचा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना भविष्य काळातील जग हे मानवाधिकाराचे रक्षण करणारे, स्त्री-पुरुष समतेचा अंगिकार करणारे, अहिंसेने आणि शांततेने सगळ्यांना जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेजण करतो. आपल्या भावी पिढीची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आज त्या दिशेने पडलेले माझे महत्त्वाचे पाऊल आहे. हा पुरस्कार भविष्य काळात मला ऊर्जा देईल. समस्त भारतीयांच्या वतीने, जगभरात लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारते असं वर्षा देशपांडे यांनी पुरस्कार घेताना सांगितले.

कोण आहेत वर्षा देशपांडे?

वर्षा देशपांडे यांनी १९८८ मध्ये झोपडीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली. १९९० मध्ये त्यांनी दलित महिला विकास मंडळाची स्थापना केली. त्यांनी एचआयव्हीग्रस्त ट्रक चालक, क्लीनर, फिरता वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी प्रकल्प चालविले. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्टिंग ऑपरेशन करून जवळपास १८० डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यांना आतापर्यंत २० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या ३५ वर्षांत भारतात लैंगिक समानतेसाठी काम केले. त्यांनी जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या स्तरांवर काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’तर्फे त्यांना ११ जुलै रोजी न्यूयॉर्क येथे हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago