आरोग्य

फक्त ४ भाज्या नियमित खा; पोटात पडणारी आग- आतड्यांना सूज हे गंभीर आजार राहतील दूर

आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही तुम्हाला ४ अशा भाज्यांबाबत सांगणार आहोत, ज्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. तसेच या भाज्यांमध्ये पाणी सुद्धा मुबलक असतं. नियमितपणे जर या भाज्या खाल्ल्या तर आतड्यांसंबंधी समस्या दूर राहतील.

आतड्या हेल्दी ठेवणाऱ्या भाज्या

टोमॅटो: टोमॅटोमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. त्यासोबतच यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात, जे आपली पचनक्रिया आणखी चांगली करतात. यात लायकोपीन नावाचं तत्व असतं, जे आतड्यांची सफाई करण्यास मदत करतं. रोज टोमॅटोची भाजी खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते आणि पोटाला थंडावा मिळतो.

काकडी: उन्हाळ्यात काकडी भरपूर खाल्ली जाते. यात पाणी भरपूर असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. तसेच काकडीनं आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. काकडीमध्ये फायबर भरपूर असतं त्यामुळे रोज काकडी खाल्ल्यानं पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या लगेच दूर होते. उन्हाळ्यात भरपूर काकड्या खाल्ल्यानं शरीर शांत आणि थंड राहतं.

पालक: पालक भाजीमध्ये वेगवेगळे व्हिटामिन्स असतात. सोबतच यात पाणी आणि फायबर दोन्ही तत्व जास्त असतात. ज्यामुळे आतड्या निरोगी राहतात आणि त्यांमध्ये जळजळही होत नाही. पोट थंड ठेवण्यासाठी पालक खूप फायदेशीर मानली जाते. आठवड्यातून एक ते दोन वेळा पालक खाल्ल्यास पचन तंत्र मजबूत राहतं.

तुरई: उन्हाळ्यात तुरई भरपूर मिळते. ही एक खूप पौष्टिक भाजी मानली जाते. यात कॅलरी कमी असतात आणि आतड्यांची सफाई सुद्धा करते. ही भाजी पचायला हलकी असते. पोटाच्या आरोग्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्यानं पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

3 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

3 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

8 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

8 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

8 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

8 तास ago