vinod-tawde-virar
मुंबई : विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधी विरारमध्ये आज (मंगळवार) मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे. भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर सध्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केला आहे.
संपूर्ण घटनाक्रम…
भाजपचे केंद्रीय मंत्री विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीला मिळाली होती. यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या सगळ्या प्रकरणावर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज 5 कोटींची रक्कम वाटण्यासाठी विरारमध्ये येणार आहेत. ही माहिती भाजपच्या नेत्याने दिली. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी कारवाई केली. विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या.
विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
या संपूर्ण घडामोडीनंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवतीर्थावरील सभेत त्यांच मन आणि हृदय सुद्धा रिकाम होत; आदित्य ठाकरे
सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी: रमेश चेन्नीथला
मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ; अनंत गाडगीळ
एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं; राहुल गांधी
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…