राजकीय

शिवतीर्थावरील सभेत त्यांच मन आणि हृदय सुद्धा रिकाम होत; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला . आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत . मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केल. या पत्रकार परिषदेतून ‘हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीच आहे, मात्र धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ, पण अदानी टेंडर मात्र रद्द करू, असा विश्वास धाराविकरांना आदित्य ठाकरे यांनी दिला.

मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातय.

मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्देश पाटणकर यांच्या नवे एक पत्र फिरवलं जातय, या पत्रातून उद्देश पाटेकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याचा दावा केला जात आहे . मात्र हे पत्रक खोटं असून उद्देश पाटेकर यांनी पोलिसात या संदर्भात तक्रार दिलेली आहे . यावर बोलताना ‘जर या संदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही, तर आम्ही समजू भाजपची भांडी निवडणूक आयोग घासत आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार; आदित्य ठाकरेंचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागातील घोटाळा आदित्य ठाकरे यांनी समोर आणला. यावेळी २६-१२-२०२२ MMRDAचे दोन पत्र आदित्य ठाकरेंनी दाखवले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली . ज्यामध्ये मेट्रो पोल आणि इतर भागांना रंगरंगोटी करण्यात येईल असं म्हटलं. ७४ कोटी रुपये काम होण्याआधी रंगरंगोटीसाठी खर्च केले जात आहेत . त्यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करताय, हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिश्यात जाताय . काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करणार पुन्हा खर्च करणार . असा हा घोटाळा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवतीर्थावरील सभेत मन आणि हृदय सुद्धा रिकामं होत; आदित्य ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभेविषाई बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘जिथे माझ्या आजोबांचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृति स्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची शिवतीर्थावर सभा घेण्याची हिंमत झाली . पण तिथे एवढी मोठी सभा आयोजित केली पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकाम होतं’.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

8 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

16 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

17 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

18 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

22 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

22 तास ago