महाराष्ट्र

अकरावीचे ऑफलाईन प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा

मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेणे किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणे महाविद्यालयांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा प्रकारचे प्रवेश आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि मुख्याध्यापकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. या प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, काही कनिष्ठ महाविद्यालयांकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढे इयत्ता १२ वीच्या राज्य मंडळाच्या अर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रवेश नियमित न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

ऑफलाईन प्रवेश देऊ नका

त्यामुळे राज्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑफलाईन पद्धतीने अकरावीचे प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. तसेच मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासही मनाई करण्यात आली आहे.

नियम मोडल्यास कारवाई

या सूचनांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय तसेच मुख्याध्यापकांविरुद्ध महाराष्ट्र कर्मचारी खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ आणि नियमावली, १९८१ मधील तरतुदींनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, असा इशारा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये आणि अकरावी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खासगी शिकवणी केंद्रांच्या कायद्याला १५ सप्टेंबरपर्यंत हरकतींची मुदतवाढ; आतापर्यंत ११ हजारांहून अधिक सूचना

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या…

2 तास ago

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक…

2 तास ago

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने…

13 तास ago

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३०…

13 तास ago

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

1 दिवस ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

1 दिवस ago