महाराष्ट्र

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले, नालेसफाईच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, मुंबईकरांची फसवणूक

मुंबई: मुंबईत अवघ्या पहिल्याच पावसात अनेक सखल भाग जलमय झाले. सायन, दादर, कुर्ला, कलिना, चांदिवली असल्फा,चेंबूर, धारावी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली आदी परिसरांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाण्यातून वाट काढत घरापर्यंत पोहोचावे लागले. महिला, वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

प्रश्न असा आहे की, दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ढासळलेलीच का दिसते? नालेसाहेब कागदावर स्वच्छ, प्रत्यक्षात मात्र गटारांसारखी अवस्था! हे नक्की कोणाचे अपयश.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी खालील गंभीर आरोप केले.नालेसफाईचे कंत्राटे हे ठरावीक ठेकेदारांनाच दिले जातात, तेही वर्षानुवर्षे!फक्त कागदोपत्री सफाई दाखवून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. प्रत्यक्षात अनेक नाले अजूनही तुंबलेले आहेत.मुंबई महापालिकेतील संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमत आहे.

साफसफाईच्या अहवालावर कोणतेही प्रत्यक्ष ‘ऑन-ग्राउंड’ ऑडिट होत नाही, केवळ फाईलवर सही केली जाते.

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत.

मागण्या नालेसफाई प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी.दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.दर महिन्याला नालेसफाईसंबंधी ऑन-ग्राउंड ऑडिट जाहीर करावे.नागरिकांसाठी ‘नालेसफाई ट्रॅकर’ ॲप विकसित करून पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी.जलतपासणी प्रयोगशाळा व नालेसफाईच्या कामांवर तृतीयपक्षीय निरीक्षण सक्तीचे करावे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात पावसाळा म्हणजे दरवर्षीची जलदु:खकथा का ठरावी? मुंबई महापालिकेने तातडीने उत्तर द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा ॲड. मातेले यांनी दिला.

ॲड. अमोल मातेले

मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

33 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago