महाराष्ट्र

जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही

मुंबई: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईनरमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकरावकोकाटेयांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेयांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. माणिकरावकोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईनरम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नाराजी व्यक्त केली होती. तर अजित पवार या सगळ्यावर मौन बाळगून होते. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकही नेता माणिकराव कोकाटे यांच्या बचावासाठी मैदानात उतरला नव्हता. तेव्हाच माणिकरावकोकाटे यांची उचलबांगडी होण्याचे संकेत मिळाले होते.

माणिकराव कोकाटे हे काल स्वत:हून आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, कोकाटे यांनी कालही नेहमीप्रमाणे ‘मीच बरोबर कसा?’ हा धोशा लावला होता. हे सगळे पाहता ते स्वत:हून राजीनामा देण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे आता अजित पवार यांनाच स्वत:हून कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. यापूर्वी सूरज चव्हाण यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. लातूरमध्येसूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी माफी मागून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात होती. सूरज चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याने शेवटी अखेर अजित पवार यांनी स्वत:च ट्विटकरुन चव्हाण यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्याचप्रकारे आता माणिकरावकोकाटे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्पूर्वी आदल्या दिवशी माणिकरावकोकाटे आणि अजित पवार यांची फोनवरुनबातचीत झाल्याची चर्चा होती. त्यामुळे काल माणिकरावकोकाटे हे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, माणिकरावकोकाटे यांनी राजीनामा किंवा दिलगिरी तर सोडाच पण व्हिडीओव्हायरलकरणाऱ्यांनाकोर्टात खेचण्याची भाषा केली होती. आपल्याकडून काहीच चुकीचे कसे घडले नाही, नेहमीप्रमाणे आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्यातच माणिकरावकोकाटे यांची पत्रकार परिषद खर्ची घातली होती. हे करताना माणिकरावकोकाटे यांनी आणखी एक घोळ घालून ठेवला. त्यांनी या पत्रकार परिषदेत ‘शासनभिकारी’ असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच अजित पवार यांनी माणिकरावकोकाटे यांना आता पाठिशी घालायचे नाही, असे ठरवल्याचे सांगितले जात होते. माणिकरावकोकाटे हे आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी येणार होते. दुपारी तीन वाजता या दोन्ही नेत्यांची बैठक ठरली होती. मात्र, हा दौरा अचानक रद्द झाला होता. अजितदादांनी कोकाटेंना भेट नाकारल्याने आता त्यांची गच्छंती अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago