महाराष्ट्र

…तर काँग्रेसला झटका! सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात

कोल्हापूर: काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र, पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला अधिकच अडचणीत आणणारा आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसू शकतो. करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मानणारा मोठा गट आहे.

शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार चंद्रदीप नरके आणि पाटील गटात राजकीय वैर आहे. महायुती म्हणून या दोन गटाचे मनोमिलन करणे मोठे आव्हान असणार आहे. पूर्वी करवीर आणि सांगरूळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.

त्यानंतर हे दोन्ही मतदारसंघ एकत्र झाल्याने करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले जवळपास 20 ते 25 वर्ष आमदार नरके विरुद्ध पाटील गट असा एकमेकांच्या विरोधात आहे आजपर्यंत पी.एन पाटील यांचा गट आणि काँग्रेसचा निष्ठावंत गट यांनी कधीच शिवसेनेला मदत केली नसल्याचा इतिहास या मतदारसंघात आहे.

सध्या राहुल पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस वाट धरत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातील गावागावात असलेला नरके विरुद्ध पाटील गट यांच्यात मनोमिलनाचे मोठे आव्हान महायुती म्हणून राहुल पाटील यांच्यासमोर असणार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेचे आमदार आहेत.

पुढील वर्षी त्यांची मुदत संपणार आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असताना राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद पाहिली तर करवीर तालुक्यातील 12 पैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल पाटील यांची ताकद अधिक आहे.

गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा वर्ग अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच जिल्हा परिषदेच्या सहा मतदारसंघात राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे काँग्रेसला अडचण ठरू शकते. त्याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते.

करवीर तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. तर जवळपास 24 पंचायत समिती आहेत. त्यातील पाच ते सहा जिल्हा परिषद मतदारसंघ हे दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. तर उर्वरित पाडळी खुर्द, सांगरूळ, सडोली दुमाला, निगवे खालसा, वडनगे, शिये जिल्हा परिषद मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघात येतात. त्यातील वडणगे, शिये, निगवे खालसा आधी गन आणि गट मतदारसंघात नरके गटाची ताकद आहे. तर पाडळी खुर्द, जुना सांगरूळ, सडोली दुमाला निगवे खालसा या मतदारसंघात राहुल पाटील यांच्या गटाची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे काँग्रेसला करवीर विधानसभा मतदारसंघातून अधिक फटका बसू शकतो.

महायुती म्हणून या पक्ष प्रवेशाकडे पाहिल्यास त्याचा अधिक फायदा हा शिवसेनेला होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढायचे झाल्यास वर कधीही शिवसेनेच्या पाठीमागे न राहिलेल्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना नरके गटाच्या मागे उभे राहावे लागणार आहे. त्याचा फायदा थेट करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

23 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

23 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

1 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

1 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

1 दिवस ago